‘माझी बायको.. माझं वेड’; बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची रोमँटिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात सतत चर्चेत असणारे जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलिया यांची जोडी ट्रेंडिंग जोड्यांपैकी एक आणि लोकप्रिय जोड्यांच्या यादीतील एक आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जिनिलिया कायम एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. मग एखादा इव्हेन्ट असो, पार्टी असो किंवा मग सोशल मीडिया. माझं तुझ्यावर प्रेम आहे.. म्हणायचे ते कधीच कचरत नाहीत. इतकेच काय तर त्यांचे कॉमेडी रीलदेखील इतके क्युट असतात कि हमखास व्हायरल होतात.

आजही अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या बायकोसाठी अशीच एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. तसे या पोस्टमागे अत्यंत खास कारण आहे आणि ते म्हणजे जिनिलियाचा बर्थडे. आज जिनिलियाचा ३६ वा वाढदिवस आहे. आजचा दिवस तिच्याइतकाच रितेशसाठीसुद्धा खूप खास आहे आणि म्हणून त्याने आवर्जून ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने जिनिलियासोबतचा एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये आपले प्रेम शब्दांत व्यक्त करण्याचा एक अतिशय गोड प्रयत्न केला आहे.

रितेशने लिहिलंय, ‘माझ्या जिवलग मैत्रिणीला, माझी कठोर टीकाकार, माझी कट्टर समर्थक, माझ्या गुन्ह्यातील भागीदार, माझी सर्वात मोठी चीअरलीडर, माझी जीवनरेखा, माझे सर्वकाही- तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद, माझी निरंतर राहिल्याबद्दल धन्यवाद.. माझे वास्तव. माझी बायको.. माझे वेड!!! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.. हॅपी बर्थडे जिनिलिया’. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे. ‘वेड’ चित्रपटातून या जोडीने साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. सत्या आणि श्रावणीच्या प्रेमात जितकं वेड होतं तितकाच रितेश आणि जिनिलियाच्या प्रेमातही वेड आहे हे अनेकदा दिसून आलं आहे.