हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. हे जोडपं नुसतं मराठी नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही कायम चर्चेत असतं. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलिया विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. पण आता पुन्हा एकदा रितेश – जिनिलिया पालक होणार आहेत असे दिसत आहे. एका व्हायरल व्हिडीओमूळे जिनिलीया पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात जिनिलीया- रितेशने हजेरी लावली होती. यावेळी जिनिलीयाने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिचे बेबी बंपकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या. या व्हिडीओमुळे जिनिलिया पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये जिनिलिया गरोदर असल्याचे वाटत आहे.. असे म्हटले आहे. तर काहींनी सरळ रितेशला तिच्या प्रेग्नेंसीबाबत प्रश्न विचारले आहेत. यावर आता रितेशने प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन जिनिलीया देशमुख गरोदर असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना रितेशने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सोबतच लिहिलं आहे कि, ‘अजुन २ – ३ मुलं असली तरी मला काही हरकत नाही, पण दुर्देवाने या बातमीत काही तथ्य नाही’. यानुसार जिनिलियाच्या प्रेग्नेंसीची चर्चा वायफळ आहे असे त्याने स्पष्ट केले आहे.