‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये रितेश- जिनिलियाची बाजी; एक दोन नव्हे 9 पुरस्कारांवर कोरलं नाव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हि अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. दोघांनीही बॉलिवूड आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. दोघांच्या ‘वेड’ या चित्रपटाने तर आभाळाला हात टेकले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आणि हे प्रेम पुन्हा एकदा पुरस्कारांच्या रूपात पहायला मिळालं. नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा पुरस्कार सोहळा पार पडला आणि यावेळी रितेश- जिनिलियाच्या जोडीने एक दोन नव्हे तर अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा मराठी कलाविश्वातील अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. या सोहळ्यात रितेश आणि जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाने एकावेळी ९ महत्त्वाचे पुरस्कार मिळवले आहेत. याबाबत अभिनेता रितेश देशमुखने अधिकृत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली आहे. जाणून घेऊया रितेश- जिनिलियाच्या नवे कोणते पुरस्कार झाले आहेत ते खालीलप्रमाणे:-

‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ – (मुंबई फिल्म कंपनी),
‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ (रितेश देशमुख),
‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ (जिनिलिया देशमुख),
‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (रितेश),
‘सर्वोत्कृष्ट गाणं’ (सुखं कळले),
‘सर्वोत्कृष्ट गायक’,
‘सर्वोत्कृष्ट गायिका’,
‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा’ (जिनिलीया),
‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर’ (रितेश) अशा नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांनी रितेश आणि जिनिलियाला ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. त्यामुळे हि पोस्ट शेअर करताना रितेशने ‘वेड’ चित्रपटाची टीम, अजय- अतुल, श्रेया घोषाल, झी टॉकीज आणि ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचे आभार मानले आहेत.