Rutuja Bagave | ‘आजही लोकांना मत मांडणाऱ्या मुली आवडत नाही…’ ऋतुजा बागवेचे वक्तव्य चर्चेत


Rutuja Bagave | मराठी चित्रपटसृष्टी मध्ये असे अनेक कलाकार आहे जे त्यांचे मत सोशल मीडियावर त्याचे मत मांडतात. त्यामुळे ते खूप चर्चेत येतात. अशीच एक अभिनेत्री ती म्हणजे ऋतुजा बागवे. ही सध्या तिच्या सोंग्या या चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. तसेच तिने अनन्या या नाटकातून देखील तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडलेली आहे. नुकतेच प्रमोशनदरम्यान तिने माध्यमांना मुलाखत दिली त्यावेळी तिने एक वक्तव्य केलं.

या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आलं की, एक स्त्री म्हणून तुला आजही कोणत्या गोष्टी खटकतात? यावर ती म्हणाली की, “मला असं वाटतं की आजही लोकांना मत मांडणारी मुलगी आवडत नाही…म्हणजे त्यांना असं वाटतं की, ही अति बोलते किंवा हिला मत असू शकत असून शकतं. ही का मानते मी म्हणते ती समज चुकीचं असेल किंवा बरोबरही असेल पण तिला मत असू नये हे जे काही लोकांचं म्हणणं आहे ना ते मला खटकतं.”

हेही वाचा –अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल

पुढे ती म्हणाली की, “आज आपण इतक्या स्वातंत्र्य आहोत इतके शिकलेले आहोत.आपल्याला आपलं मत मांडण्याची मुभा असली पाहिजे. तडजोड तर आपण सगळ्याच करत असतो. पण अन्याय सहन करणे ही तितकाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तडजोड आणि अन्याय सोसण यातील जी बारीक रेषा आहे. ती आपल्या प्रत्येकालाच माहीत असणे गरजेचे आहे. आणि त्यावर वेळोवेळी आवाज देखील उठवला पाहिजे. कधी कधी तुमच्या मतांना तितका आधार दिला जात नाही का तर तुम्ही मुली आहात म्हणून …पण आजकाल आपल्या पिढीतले मुलं खूपच कमाल आहे. त्यांना चूल मूल सांभाळणाऱ्यापेक्षा अशा मुली आवडतात ज्यांना आपलं मत आहे ज्या स्वतंत्र आहेत.”

ऋतुजाचा सोग्या हा चित्रपट 15 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समाजातील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे ही साकारणार आहे. या चित्रपटात अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप इत्यादी कलाकार आहेत.