Rutuja Bagave | मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अत्यंत साध्या सोज्वळ भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केलेले आहे. अनेक मालिकांमधून ती घराघरात पोहोचलेली आहे. एका मुलाखती तिच्या करिअरबद्दल आणि तिला दिलेल्या तिच्या वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. याआधी तिने या गोजिरवाण्या घरात या मालिकेत काम केले होते आणि अचानक तिला रिप्लेस केले ते सांगितले याबद्दल तिने आता उघड केलेली आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ऋतुजाने सांगितले की, “अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मला नायीका होण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. कारण मी उत्तम अभिनय करते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आपल्या भूमिका कमी जास्त सुद्धा होतात. पण तू वाईट काम करतेस असं अजून तरी मला कोणी सांगितलं नाही. आणि हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. या उलट नायिका म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला असंख्य ऑडिशन द्यावे लागले. खूपदा रिजेक्ट ही झाली पण मी कधी झाले नाही कारण एका स्पर्धेचा गाभा माझ्या पाठीशी होता.”
पुढे ऋतुजा म्हणाली की, “2007 साली मला ह्या गोजिरवाण्या घरात ही पहिली मालिका मिळाली. पण या मालिकेतून मला अचानक रिप्लेस करण्यात आलं होतं. त्यानंतर मी पुन्हा नाटकांकडे वळाले. वयाच्या 27व्या वर्षी मला नायीका म्हणून पहिलं काम मिळालं. तोपर्यंत मी सगळ्या मालिकांमध्ये कमी हो छोट्या-मोठ्या भूमिका वयापेक्षा मोठ्या भूमिका करत होते. 2007 नंतर ते 2015 मध्ये मला नाही का म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही आठ वर्षे मला स्वतःला सिद्ध करावं लागलं. पण या काळात अभिनय काय शंभर एपिसोड नंतर कोणीही करेल पण नाही तिकडे बघताना छान वाटलं पाहिजे हे ही वाक्य मी ऐकलेली आहेत.”
ऋतुजाने या आधी नांदा सौख्यभरे, तू माझा सांगाती, चंद्र आहे साक्षीला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे तिने लंडन मिसळ आणि सोंग चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.