Saarkahi Tichyasathi | नकळतपणे निशीची उष्टी हळद लागणार नीरजला, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट


Saarkahi Tichyasathi | झी मराठीवरील सारे काही तिच्यासाठी ही मालिका सगळ्यांना खूप आवडते. या मालिकेने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. सध्या दादा खोत यांच्या घरात श्रीनिवास आणि निशीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. मेहंदीच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर हळदीचा कार्यक्रम देखील होणार आहे.

खोतांच्या घरात देखील सगळे खुश आहेत. या लग्नाच्या गडबडीत नीराज आणि श्रीनु यांची गाठभेट होते. आणि नीरज श्रिनुकडून एक वचन घेतो की, निशीला लग्नानंतर देखील तो बॅडमिंटन खेळण्याची परवानगी देईल. इथे उमा सुद्धा निशीचा खेळ चालू राहावा म्हणून विनंती करते. त्यानंतर उमा आणि मिरज यांचे हे बोलणं ऐकून श्रीनु रघुनाथ गावांकडे निशीला खेळ चालू ठेवण्याची मागणी मागायला जातो.

या सगळ्या गडबडीत श्रीनु आणि निशा यांच्या लग्नाच्या हळदीचा मांडव देखील बांधलेला आहे. हळदीचा कार्यक्रम सुरू होत असतानाच योगायोगाने श्रिनुची उष्टी हळद ही ओवीला लागते. आणि निशीला लागलेली हळदी निरजला लागते. त्यामुळे आता रघुनाथ राव निशीला लग्नानंतर खेळ सुरू ठेवण्याची परवानगी देतील का? त्याचप्रमाणे उष्टी हळद लागलेली पाहून सगळेजण काय निर्णय घेतील. आणि ओवी खरच देश सोडून जाईल का? असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. त्यामुळे त्या काही भागातच आपल्याला सगळ्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.