हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायम विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हि आनंदाची बातमी अशी कि, सईने नवं घर खरेदी केलं आहे आणि तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. हक्काच्या घरात रहायला गेल्याचा सईला जितका आनंद आहे तितकंच जूनं घर सोडताना तिचं मन भावनिक झालं आहे. हा व्हिडीओ असाच काहीसा भावनिक आहे आणि त्याहून जास्त यासोबतचे कॅप्शन आपले लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओत सई म्हणतेय की, ‘मला या घरातून जायचं नाही, मला माहिती आहे ते घर मोठ आहे.. मस्त आहे पण काही गोष्टी सुटत नाहीत, तसचं काहीस या घराबद्दल आहे. या घराने मला खुप काही दिलयं. मी ते नाही सोडू शकत..’. या व्हिडिओमध्ये सई तिच्या जुन्या घरातील सामान पॅक करताना आणि टेम्पोत भरताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सई व्यक्त झाली आहे. तिने लिहिलंय, ‘द एलेव्हन्थ प्लेस. पुन्हा घाबरून आणि उत्साहाने, मी नवीन घरात पाऊल ठेवले, एक स्वप्न पूर्ण झाले, माझं पहिलं मुंबईतील घर, एक मैलाचा दगड गाठला, घरी बोलावण्याचं ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील. पण आनंदादरम्यानच एक कडवट आठवण, एके काळी जे माझे डोमेन होते त्याला मी निरोप देताना, ओळखीच्या भिंती आणि जुन्या घराला निरोप..’
‘ज्या आरामात मी एकेकाळी खुप आनंदी राहत होते. प्रत्येक खोलीतील आठवणी कुजबुजताय, हास्याचे क्षण, आवाज आणि भूतकाळातील गोष्टी.. भावनांचा सिम्फनी, एक गुंफणारा यमक. पण मी पुढे या नवीन अध्यायाला सुरुवात करत असतांना विनम्र कृतज्ञतेने माझे हृदय भरुन आलयं. केलेल्या आठवणी आणि शिकलेल्या धड्यांसाठी, या नवीन घरात, नवीन स्वप्ने मी जमवेल. म्हणून मी कृतज्ञतेने मिठी मारत त्याचा निरोप घेते, जुन्याकडे, आम्ही एकदा शोधून काढलेल्या प्रवासापर्यंत, आणि नम्र अपेक्षेने चमकत आहे, मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक प्रकाशाचा किरण’. सईच्या या पोस्टवर नेटकरी, चाहते आणि तिची कलाविश्वात मित्र मंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रिपोर्टनुसार, सईने गतवर्षी तिच्या वाढदिवशी मुंबईतील मालाडमध्ये ४५’व्या मजल्यावर 3 BHK आलिशान घर घेतलं आहे. जिथे काही दिवसांपासून इंटिरियरचे काम सुरु होते. या घरात आता सईने गृहप्रवेश केला आहे.