Sai Lokur | आईच्या भूमिकेत प्रवेश करण्याला सई लोकूरला क्रांती रेडकरने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला


Sai Lokur | अभिनेत्री सई लोकूर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसमुळे सई खूप प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. सध्या सई सिनेसृष्टीपासून दूर आहे परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या ती एक वेगळाच आनंद अनुभवत आहे.

तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील माहिती तिच्या चाहतांना देत असते. सई लवकरच आई होणार आहे आणि तिच्या प्रेग्नेंसी दरम्यानचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकांना तिचे हे व्हिडिओ आवडतात तर अनेकजण तिला ट्रोल करतात परंतु सई त्यांना वेळोवेळी उत्तर देत असते.

सईचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम | Sai Lokur

नुकतेच सईचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी तिच्या जवळच्या अनेक मैत्रिणी देखील तिच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तिने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते जे चांगलेच व्हायरल झालेले आहेत.

हेही वाचा – ‘झिम्मा 2’मध्ये रिंकू साकारतेय सरळ पण प्रेमळ ‘तानिया’ची भूमिका; पोस्टर आले समोर

क्रांती रेडकरने दिला सईला सल्ला

तिचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार देखील तिला आशीर्वाद देत आहेत. आणि तिचे अभिनंदन करत आहे. अनेकांनी तिला सल्ला देखील दिलेला आहे. यातच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील सईला सोशल मीडियावर कमेंट करून एक मुलाचा सल्ला दिला आहे.

सईने शेअर केलेल्या व्हिडिओवर क्रांती रेडकरने कमेंट केली की, “झोपून घे बाई भरपूर तुला आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याला खूप खूप प्रेम.” तिच्या या कमेंटला सईने उत्तर दिले आहे की, “प्रत्येक आई मला हाच सल्ला देत आहे धन्यवाद तू दिलेल्या शुभेच्छांसाठी.”

सईने मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. परंतु बिग बॉस मराठीचा पहिल्या पर्वानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या सई तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी आनंद घेताना दिसतीये