Sai Lokur | सई लोकूरने केले लेकीचे बारसे, मुलीच्या नावाचा अर्थ आहे खूपच सुंदर


Sai Lokur | काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री सई लोकूर हीने एका सुंदर अशा मुलीला जन्म दिलेला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिला मुलगी झाल्याची बातमी दिली. मुलीच्या जन्माने सई आणि तिचा पती तीर्थदीप दोघेही खूपच आनंदात आहे. नुकतेच सई आणि पतिने तिच्या लेकीचे बारसे केले आहे. आणि नावे ठेवले आहे. आणि याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिलेली आहे.

साई लोकर हीने तिचा पती आणि तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि त्यांच्या मुलीचे नाव देखील सांगितले आहे. सई आणि तीर्थदीपने त्यांच्या मुलीचे नाव ताशी असे ठेवलेले आहे. तसेच तिच्या नावाचा अर्थ देखील सांगितलेला आहे.

फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही एक महिन्याचे झालो. आमचा आनंद आमच्या डोळ्यांतील तारा ताशी रॉय या आमच्या परीची ओळख करून देत आहोत. आई आणि बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्हाला तुझे पालक झाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. या जगातील तू सगळ्यात सुंदर गोष्ट आहेस. ताशीचा अर्थ समृद्धी आणि सुख असा असतो. तिने केलेल्या ह्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिच्या अभिनंदन करत आहे.

हेही वाचा – मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टर रिलीज

त्याचप्रमाणे तिच्या हाताना तिच्या मुलीच्या नावाचा अर्थ देखील आवडला आहे. सईने 2020 मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्न केले. लग्नानंतर तीन वर्षांनी ते दोघे आई बाबा झालेले आहेत. सई हीने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे परंतु बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यानंतर ती खूप नावारूपात आली.