Sai Tamhankar And Sonalee Kulkarni | ‘तुमचं लंडन दुबई होऊद्या आधी…’, सोनालीच्या प्रश्नावर सईने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल


Sai Tamhankar And Sonalee Kulkarni |अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी सोबतच बॉलीवूडमध्ये देखील तिच्या एक आढळते स्थान निर्माण केले आहे. आज-काल मराठीमधील आघाडीच्या नायिकांमध्ये सई ताम्हणकर हिच्या नावाचा समावेश होतो. मराठी तसेच बॉलीवूडमध्ये देखील सईने तिचे चाहते निर्माण केलेले आहे. तिच्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे सई नेहमीच चर्चेत असते. इंडस्ट्रीमध्ये देखील सईच्या अनेक मैत्रिणी आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होय.

नुकतेच सोनाली आणि सई या दोघींनी देखील नवीन घर खरेदी केलेले आहे. सईने मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे, तर सोनालीने दुबईमध्ये नवीन घर खरेदी केकेले आहेत. दोघींनीही त्यांच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता सोनालीने शेअर केलेल्या पोस्टवर सई ताम्हणकरने एक कमेंट केली आहे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

सोनालीने कमेंट करून सईला “तुझ्या घरी कधी बोलावतेस असा प्रश्न विचारला आहे” आणि त्यावर सईने देखील मजेशीर उत्तर दिलेले आहे.

हेही वाचा- ‘प्रत्येक बहिणीच्या पाठीशी…’; आनंद दिघेंचा उल्लेख करणारी प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोनालीने तिच्या दुबईमधील घरातील फोटो शेअर केला आहे. यावर सईने क्यूटी अशी कमेंट केली आहे.त्यावर सोनालीने “ते सर्व ठीक आहे पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी,” अशी कमेंट केली आहे. यावर पुन्हा सईने तिला रिप्लाय दिला आहे की, “तुमचा लंडन दुबई झाले की सांगा मॅडम.” यावर सोनालीने “राहू दे राहू दे” अशी कमेंट केली आहे.

या दोघींच्या संभाषणाचा हा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. सोनाली आणि सईदोघीही सध्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत. त्या दोघी आगामी अनेक चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांचे चाहते देखील त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.