भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर’; Video झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर हे नाव अगदी खणखणीत वाजतंय. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने सई ताम्हणकर हि कायम चर्चेचा विषय होताना दिसते. एकतर सई आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि त्यात ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सई ताम्हणकरचा बिंधास्त अंदाज तिला इतरांपेक्षा हटके बनवतो. तर कधी कधी हाच अंदाज तिला महागात पडतो. सध्या सोशल मीडियावर सईचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चक्क भररस्त्यात नाचताना दिसते आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान सईचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सई चक्क भररस्त्यात गाडी थांबवून नाचताना दिसते आहे. आता ती का नाचतेय..? असा प्रश्न पडला असेल तर याच उत्तर तिने कॅप्शनमध्ये दिल आहे. सईने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मी चांगला टेक दिल्यानंतर सेलिब्रेट करताना…’. सईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सईच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी सईला ट्रोल केलंय तर काहींनी तिच्या बिनधास्त अंदाजाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘माकड चावलेलं आठवलं’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘बाळ्या डान्स’. तर काहींनी सईच्या मस्त मौलाना अंदाजाचे कौतुक केले आहे. सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.