सईबाई, काय हे बाई..? अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘हि बघा मराठी उर्फी..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सई ताम्हणकर हे मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. ब्युटी विथ माईंड .. आणि मराठमोळ्या बोल्डनेसचा तडका म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. तसं तर मराठी सिनेविश्वात अनेक अभिनेत्री बोल्ड आहेत. पण सईची बात काही औरच!! सई ताम्हणकर कायम वेगवेगळी फॅशन करताना दिसते. अनेकदा तिची फॅशन नेटकऱ्यांच्या डोक्यावरून जाते. आताही सईने एक नवा लूक शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी तिला ‘मराठी उर्फी’ म्हणून संबोधले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचं हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये सईने व्हाईट शर्ट, ब्लेझर आणि ब्लॅक स्कर्ट काही वेगळ्याच पद्धतीने परिधान केला आहे. तिचा हा वेगळा लूक सोशल मीडियावर फारच लक्षवेधी ठरतो आहे. तिच्या या लूकवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यांपैकी काहींनी सईला नेहमीप्रमाणे, ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ म्हटले आहे. तर काहींनी मात्र सईच्या फॅशन सेन्सची पुरती खिल्ली उडवली आहे.

सई ताम्हणकरच्या या फोटोंवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘पहिले सई ला माकड चावलं मला वाटत आता तिला बहुतेक उर्फी जावेद……….’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘मी पण तोच विचार करतोय हिला पण तिचं वारं लागलं की काय आता घरातले फाटके तुटके कपडे गोळा करुन ठेवायला बरं निदान गोधडी नाही तरी घालायला तरी उपयोगी पडतील ह्या बयेला… कपड्यांची कमतरता आहे खुप बिच्चारी’.

अन्य एकाने म्हटले, ‘खतरनाक.. पण पँटची डिझाईन तर जगाबाहेरची आहे.. कोण आहे तुझा डिझायनर..?’ आणखी एकाने म्हटले, ‘माहित नाही का… पण बघून मला थेट उर्फी जावेदची आठवण झाली’.