Sai Tamhankar New Home – सांगलीची सई मुंबईकर झाली!! आलिशान घर, लक्षवेधी इंटीरियर.. अभिनेत्रीने शेअर केले होम टूर VIDEO


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sai Tamhankar New Home) मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर मूळ सांगलीची. पण आता सईने मुंबईमध्ये स्वतःच हक्काचं आलिशान घर घेतल्यानंतर ती मुंबईकर म्हणून ओळखली जात आहे. आपल्या स्वबळावर, स्वकर्तुत्वाने सई ताम्हणकरने स्वतःच घर खरेदी केलं आहे. गेली बरीच वर्ष सई भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. मात्र आता हक्काच्या घरात प्रवेश केल्यानंतर सई समाधानी झाली आहे. नव्या घरातील काही व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करताना दिसते. यातून सई आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवते आहे.

सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे सई अनेकदा तिचे नवनवीन फोटोशूट, व्हिडीओ, रिल्स, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तसेच वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. (Sai Tamhankar New Home)

सईने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भाड्याच्या घरातून हक्काच्या घरापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. या व्हिडिओंमध्ये सईने नव्या घराची झलक दाखवली आहे. सईचं नवं घर हे मुंबईत मालाडमधील भव्य इमारतीत ४५ व्या मजल्यावर आहे. सईने तिच्या ३ बीएचके घरातील इंटिरियल, फ्लोरिंग, फिटिंग्स सर्व काही लॅव्हिश स्वरूपाचे केले आहे. (Sai Tamhankar New Home)

सईने तिच्या युट्युब चॅनेलवर ‘The Eleventh Place‘ नावाने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. एकूण ३ एपिसोडची हि मालिका आहे. ज्यामध्ये तिने नव्या घराची झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी सई ज्या घरात भाड्याने वास्तव्यास होती त्या घरासोबत तीचे भावनिक नाते जोडले गेले होते. (Sai Tamhankar New Home) त्यामुळे जुनं घर सोडून बाहेर पडताना सई फार भावनिक झाल्याचे दिसले होते. तेव्हाचाही व्हिडीओ सईने सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिने नव्या घरी शिफ्ट होताना तिच्या काय भावना आहेत हे सांगितले होते.