गोड गोड बोला!! सई ताम्हणकरने नंदीबैलाला भरवला तिळगुळ’; व्हिडिओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नुकताच मकर संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. प्रत्येकाने अनोख्या अंदाजात मात्र रीती परंपरा जपत मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. अशातच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती तिळाचे लाडू वाटताना दिसतेय. यामध्ये तिने बैलाला देखील तिलाच लाडू भरवल्याचे दिसत आहे.

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा व्हिडीओ एका नामांकित एंटरटेनमेंट इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर सगळ्यांना तिळाचे लाडू वाटताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओत ती बाजूला उभ्या असलेल्या बैलाला देखील तिळाचा लाडू भरवताना दिसतेय. सईच्या या कृतीमुळे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, लवकरच ती ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत काम करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सई आणि सिद्धार्थ व्यस्त आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून याची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. या चित्रपटात सई व सिद्धार्थसोबत संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे अशी हटके स्टारकास्ट आहे.