‘अम्मा तू भारी…’; आईच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहताच सखीने शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर तिची जागा या नव्या मालिकेने घेतली आहे. सोमवारपासून सुरु झालेली हि मालिका हळूहळू कथानकात रंग घेऊ लागली आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, इरा परवडे, शुभांगी गोखले, संजीवनी कदम, अपूर्वा नेमळेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक सखी गोखलेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री शुभांगी गोखले ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री प्रधान साकारत असलेल्या मुक्ताच्या आईची भूमिका साकारत आहेत. मालिकेत त्यांची एक वेगळीच प्रतिभा आपल्याला पहायला मिळते आहे. दरम्यान शुभांगी गोखले यांची लेक आणि मराठी अभिनेत्री सखी गोखलेने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर आईचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि स्टोरी पोस्ट केली आहे.

या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सखीने एक कोलाज फोटो पोस्ट केला आहे. यावेळी तिने मालिकेतील आणि शूटींग दरम्यानचे काही फोटो कोलाज शेअर केले आहेत. यासोबत तिने हटके कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलंय, ‘नुकताच मी ”प्रेमाची गोष्ट” या मालिकेचा पहिला एपिसोड काल रात्री पाहिला… अम्मा तू भारी काम केलंस… काय भारी एपिसोड आहे. फारच छान. अजून काही भाग पाहायला नक्कीच आवडेल. स्टार प्रवाहवरील ”प्रेमाची गोष्ट” मालिका नक्कीच बघा. उत्तम लेखन, दिग्दर्शन, डिझाईन आणि कलाकार. टीमला खूप खूप शुभेच्छा’.