‘… नाहीतर बुक्कीत टेंगुळ’; ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनीची वैभ्यासाठी स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. यांपैकी एक ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका अलीकडेच ऑफ एअर झाली. त्यामुळे या मालिकेतील कलाकार कुठे आहेत..? काय करत आहेत..? याविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वेचा आज वाढदिवस आहे. तो सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत दिसतोय. त्याच्या वाढिदवसानिमित्त अभिनेत्री साक्षी गांधीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अमेय आणि साक्षी यांनी ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. यात साक्षीने अमेयच्या पत्नीची म्हणजेच अवनीची भूमिका साकारली होती. आज अमेयच्या वाढदिवशी साक्षीने एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो साक्षी आणि अमेयचा सेल्फी आहे. तर दुसऱ्या फोटोत साक्षी अमेयचं औक्षण करताना दिसत आहे. हे दोन फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन लिहिले आहे.

साक्षीने लिहिलंय, ‘तुझं ज्ञान, तुझी बुद्धी, तुझी हुशारी, तुझा स्मार्टनेस… यापलीकडे तुझी मस्ती, तुझे किस्से, तुझा कधीकधी डोकावणारा अल्लडपणा, तुझं उगीच रागावणं, तुझा Sarcasm हे सगळं असंच राहूदे… माणसाने आयुष्यात बदलावं स्वतःला असं म्हणतात… पण तू आहेस असाच राहा… आम्हाला तू असाच आवडतोस… माणसं जपत राहा… प्रेम करत राहा… तुझ्या कामाच्या आम्ही सगळे प्रेमात आहोतच… यापुढे सुद्धा तुला उत्तमोत्तम कामं मिळूदेत आणि ती कामं तू छान करशीलच… बाकी माझ्यावर सोड… मी तुला गॉसिप सांगत राहीनच… खूप सारं प्रेम मित्रा… (टिप: जमलं तर माझा अपमान कमी कर… आणि माझाशी जरा चांगलं वाग… नाहीतर बुक्कीत टेंगूळ..) हरी हरी… सीतापती सीताराम…’. साक्षीच्या या पोस्टवर अमेयने कमेंट करत तिचे आभार मानले आहेत.