शाहरुखच्या ‘जवान’कडे पाठ फिरवून वानखेडेंनी पाहिला ‘सुभेदार’; म्हणाले, ‘ते खरे वीर होते..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई करत बॉलिवूडचा बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरला आहे. मध्यंतरी ‘जवान’मधील एक डायलॉग प्रचंड चर्चेत आला होता. ज्यामुळे शाहरुखच्या लेकाला वेठीस धरणारे अधिकारी समीर वानखेडेदेखील चर्चेत आले होते.

‘बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर…’, असा तो डायलॉग होता. यानंतर आता वानखेडेंनी ‘जवान’ रिलीज झाल्यानंतर त्याच्याजागी काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘सुभेदार’ पाहिला आहे. ‘जवान’च्या डायलॉगने सोशल मीडियावर कहर केल्यानंतर आता पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत आले आहेत.

कारण ‘जवान’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांची इतकी चांगली पसंती मिळत असूनही समीर वानखेडेंनी मात्र ‘सुभेदार’ हा मराठमोळा ऐतिहासिक चित्रपट पाहिला आहे. यानंतर समीर वानखेडेंनी अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेयर करत ‘सुभेदार’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मॉलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडिओसोबत वानखेडेंनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एक महान योद्धा अन् श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. तान्हाजी शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक आहेत. प्रत्येक भारतीयाने त्यांचे अनुकरण करायला हवे. ते खरे वीर होते.’ वानखेडेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अगदी वाचण्यासारख्या आहेत.