‘मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..’; संकर्षणने चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ गोड क्षण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक अशी ओळख असलेला संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील बहुआयामी कलाकार आहे. त्यामुळे संकर्षणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर लेखणीतून देखील संकर्षणने कायम स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करायला नेहमीच प्रेक्षक वर्ग तयार असतो. ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमातून संकर्षण घरोघरी जाऊन खवैयेगिरी करताना दिसला आहे. दरम्यान या कार्यक्रमामुळे संकर्षणला अत्यंत गोड क्षण अनुभवता आला.

ज्याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. संकर्षणने ही पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ”’माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…” Please वाचा आज अमेरिकेतला डॅल्लसचा प्रयोग जोरदार झाला… प्रयोगानंतर एक काकु काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव ”उत्तरा दिवेकर” ह्या त्याच आहेत. ज्यांच्या घरी अलिबागला मी २०११ साली माझा ”आम्ही सारे खवय्ये”चा पहिला भाग शूट केला होता… योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं ”आई मला भूक लागलीये”…’

‘आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” ईतकं भरून आलं मला …. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच.. आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय…. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली, अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक ”आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज ”नियम व अटी लागू” नाटकाच्या निमित्ताने भेट झाली…. THANK YOU THANK YOU आणि हो!!! आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय… महाराष्ट्रात.. ”तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा ..’