टन टन वाजलं… मटान शिजलं!! संतोष जुवेकरने चुलीवर शिजवलं वशाट; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आयुष्यातील लहान मोठे प्रसंग, किस्से, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी तो सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. अतिशय दिलखुलास आणि तगडा अभिनेता म्हणून संतोषची ख्याती आहे. त्याचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. नुकताच सोशल मिडीयावर एक मस्त चमचमीत व्हिडीओ शेअर केला आहे. चमचमीत म्हणायचं कारण असं कि, या व्हिडिओत संतोषने चुलीवर मटण शिजवलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अभिनेता संतोष जुवेकर आपल्या मित्र मंडळींसोबत सध्या लोणावळ्यात सुट्ट्या एन्जॉय करतो आहे. नुकतंच त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये तो चुलीवर मटण शिजवताना दिसतोय. त्याच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘आज चुलीवर मटण बनवायला कम्माल मजा आली उत्तम वातावरण आणि उत्तम कंपनी. टन टन वाजलं मटान शिजलं…… सखे रस्सा रस्सा वाढगं!!! चुलीवरच मटण भावा….. नाद खुळा, टांगा पलटी घोडं फरार, खटक्यावं बोट अन जाग्याव पलटी. मळवली, पाटण गाव, लोणावळा’.

संतोषचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर त्याचे अनेक चाहते आणि नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘हॉटेलमधील मटण इज़ जस्ट अ रेसेपी चुलीवरला मटान..इज अ इमोशन.. तळहातावर चव चेक करणाऱ्याचा मान वेगळाच’. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे कि, ‘आम्हाला कधी तुझ्या हातचं खाऊ घालणार..?’. तर अन्य एका नेटकाऱ्याने लिहिले आहे कि, ‘दादा… दे थोडं पाठवून.. आम्ही पण चाखतो’. संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच त्याने ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात ‘जालिंदर’ हि भूमिका साकारली होती. जी तुफान गाजली. यानंतर आगामी काळात तो पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात महत्वपूर्ण दिसणार आहे.