हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला अभिनेता संतोष जुवेकरने एका पेक्षा एक अव्वल कलाकृतींमध्ये काम केले आहे. संतोषचे ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ हे चित्रपट तर तुफान हिट ठरले आहेत. संतोष जुवेकरचा स्वतःचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ज्याच्या संपर्कात राहण्यासाठी संतोष सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकताच संतोषने त्याचा वाढदिवस साजरा केला आणि यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट हेअर करताना संतोषने यात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याचे काही फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोंसोबत त्याने एक कॅप्शन लिहिलं आहे. ज्यामध्ये संतोषने स्वतःचा वाढदिवस कसा साजरा झाला, याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याची हि पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. हि पोस्ट शेअर करताना संतोषने शुभेच्छांसाठी आभार व्यक्त केले आहेत.
त्याने लिहिलंय, ‘Thank u आणि love u सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मला आज wish करून मेरा दिन बना डाला. ह्यावेळेला shooting मुळे बाहेर आहे so missing घरचे आणि मधुरा- पिल्लू आपली party मेरेपे उधार. वाढदिवसाच्या दिवशी माझं आवडतं काम करायला मिळणं आणि मग packup नंतर आजची संध्याकाळ फक्त मी आणि माझा वाढदिवस. cheeerrssss’. संतोषच्या या पोस्टवर अनेक चाहते, नेटकरी आणि कलाविश्वात मंडळींनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. संतोषच्या वाढदिवसानिमित्त त्याचा मित्र आणि अभिनेता कुशल बद्रिकेनेदेखील एक खास पोस्ट शेअर केली होती. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.