हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ हि मालिका तुफान गाजली. या मालिकेत भुताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे जोशी. सध्या सरिताने मनोरंजन विश्वापासून ब्रेक घेतला आहे. हे वर्ष तिच्यासाठी फारच खास ठरलं आहे. २०२४ वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरिताने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. सरिताला पुत्ररत्न प्राप्ती झाली असून नुकतेच तिने बाळाचे नाव जाहीर केले आहे.
अभिनेत्री सरिता मेहंदळेने १ जानेवारी २०२४ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. सरिताच्या घरी पाळणा हलला. बाळाच्या जन्मानंतर जवळपास १८ ते १९ दिवसानंतर तिने बाळाचे नाव जाहीर केले आहे. याबाबत तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एक क्युट फोटो शेअर केला आहे. ज्यात तिचा, बाळाचा आणि तिच्या नवऱ्याचा हात दिसत आहे. यामध्ये बाळाच्या चिमुकल्या हातात ‘अन्वित’ लिहिलेलं ब्रेसलेट दिसत आहे.
अभिनेत्री सरिताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करून बाळाच्या नावाबाबत माहिती दिली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये बाळाच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. तिने लिहिलंय कि, ‘आमच्या आयुष्यातील नवीन प्रेम, आमचा छोटा चमत्कार… अन्वित’. सरिताने बाळाच्या नावाचा अर्थ सांगताना म्हटले आहे कि, ‘अन्वित म्हणजे शौर्य आणि लीडरशिप’. सरिताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत बाळाचे नाव खूप चॅन असल्याचे म्हणत आहेत.