हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. रहस्यमय कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेच्या कथानकानुसार आता लवकरच पंचपिटिका रहस्य उलघडणार आहे. मालिकेत पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंबाने इंद्राणीला घरात स्थान दिले आहे. इंद्राणीची द्विधा मनस्थिती असताना तिला एक साधू भेटतात. जे तिला लहानपणीदेखील भेटले होते. त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे, अशी माहिती ते इंद्राणीला देतात. आता येणार पुढे ट्विस्ट.
आतापर्यंत मालिकेत आपण पाहिले कि, नेत्राने वरदानाचा उपयोग करून अद्वैतचा मृत्यूयोग टाळला. नेत्राने त्रिनयना देवीचे वरदान असलेल्या स्त्रियांसाठीचे नियम नेत्राने मोडल्याने तिचा जीवावर संकट येते. अशावेळी इंद्राणी नेत्राला सांगते की, तिने त्रिनयना देवीचा ग्रंथ वाचला तर काही मार्ग मिळेल. तर नेत्राचे आजोबा भालबा सांगतात, त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवल्यास नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळेल. यापूर्वी ग्रंथाच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लावून देवीचा मंत्र म्हणण्याची सूचना ते नेत्राला करतात.
दरम्यान, नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना तिच्या डोळ्यातील अश्रू त्यावर पडतात आणि यातून पंचपिटिका शब्द दिसतो. या पानाला कुंकू आणि पाणी लावताच एक श्लोक मोडी लिपिमध्ये लिहिलेला दिसतो. हे पंचपिटिका रहस्य काय आहे आणि त्याचा शोध नेत्रा कसा घेणार…? याचा उलगडा आगामी भागांमध्ये होणार आहे. त्यामुळे आता हि मालिका पाहण्यात प्रेक्षकांना आणखीच रस येणार आहे. एकंदरच मालिकेतील वळणं आणि रंजन कथानक मालिकेचा टीआरपी वाढविण्यासाठी सहाय्यक ठरताना दिसत आहे.