‘जीव माझा गुंतला’मधील मल्हार ‘या’ नव्या मालिकेत दिसणार; महत्वाची भूमिका साकारणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनी ही टीआरपी रेसमधील अत्यंत आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडताना दिसतात. याच वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अलीकडेच सप्टेंबर महिन्यात बंद झाली. मालिकेने अचानक निरोप घेतल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. मालिका संपली मात्र मालिकेतील अंतरा आणि मल्हार प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. तर आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे कि, या मालिकेतील मल्हार अर्थात अभिनेता सौरभ चौघुले लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ मालिका ऑफ एअर झाल्यानंतर पुन्हा या मालिकेतील मल्हार आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुले आता ‘कलर्स मराठी’नंतर ‘सन मराठी’वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतून अत्यंत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेचे नाव आहे ‘सुंदरी’. या मालिकेत सौरभ साकारत असलेल्या भूमिकेची अद्याप ओळख समोर आलेली नाही. मात्र सौरभ या मालिकेतून एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे हे नक्की.

सध्या सौरभचे चाहते त्याला या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दरम्यान, ‘सुंदरी’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता मालिकेचा नवा प्रवास सुरू झाला आहे. फक्त सौरभ चौघुले नव्हे तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातसुद्धा या मालिकेत महत्वाचा भूमिकेत झळकते आहे. अलीकडेच ‘सन मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोत वनिताचा एक वेगळाच दशणग अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला.