शरद पवारांनी पत्नीसोबत पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट, राज्य सरकारला केली ‘ही’ मागणी


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्ष गाथा सांगणारा सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण याबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या पत्नीसोबत ” हा चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

त्यांनी या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. शरद पवारांनी शालेय विद्यार्थ्यांना सत्यशोधक चित्रपट दाखवण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की, “अतिशय उत्तम चित्रपट आहे महात्मा फुलेंचे जे आयुष्य आहे त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आहेत. ते वास्तव रूपाने या ठिकाणी लिहिले मला स्वतःला असं वाटलं महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला पाहिजे राज्य सरकारला ही विनंती.”

सध्या सत्यशोधक या समाजाची मोठी चर्चा चालू आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक समाज या चित्रपट करण्यात यावा अशी मागणी केली.

या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात गणेश यादव सुरेश विश्वकर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.तसेच प्रवीण तायडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.