शशांक केतकरने खरेदी केली नवी इलेक्ट्रॉनिक कार; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘…हे स्वप्नं होतं’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता शशांक केतकर हा आजही घराघरांत श्री या भूमिकेमुळे ओळखला जातो. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक, चित्रपट आणि वेबसीरिजसारख्या विविध माध्यमांमध्ये काम करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आज यशस्वी अभिनेत्यांमध्ये आवर्जून त्याचे नाव घेतले जाते. अशातच त्याने यशाचे आणखी एक पाऊल पुढे टाकत नुकतीच नवी कोरी इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता शशांकने नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीकोरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली असून यासंदर्भात त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नव्या गाडीचे आणि गाडीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवीन technology नी मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं’.

पुढे लिहिलंय, ‘मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली marutisuzukiofficial Ertiga दुसरी kiaind Seltos आणि आता tata.evofficial Nexon.ev ! मागच्या वर्षी जेव्हा मी olaelectric घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की, petrol car वरून मी EV car वर सुद्धा shift होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील’. शशांकने पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार खरेदी केली असून तिची बाजारात जवळपास १४.७४ लाख ते १९.९४ लाख (एक्सशोरुम) एवढी किंमत असल्याचे समोर आले आहे.