‘मी नवं घरही घेतलं..’; इलेक्ट्रिक कार खरेदीनंतर शशांक केतकरने स्वतःच केला खुलासा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता शशांक केतकरने मालिका, चित्रपट, वेब सिरीज आणि नाटक अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने शशांक केतकरला प्रसिद्धी झोतात आणलं. या मालिकेत त्याने साकारलेला ‘श्री’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या शशांक त्याच्या अभिनय कारकिर्दी इतकाच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच शशांक केतकरने नवी इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याचे समोर आले. यानंतर आता त्याने नवं घर खरेदी केल्याचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेता शशांक केतकरने नवीकोरी इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केल्याची माहिती दिली होती. अनेक दिवसांपासूनचं त्याच स्वप्न त्याने पूर्ण केलं. त्याने ही इलेक्ट्रिक कार डिसेंबरमध्येच घेतली होती. मात्र याबाबत माहिती त्याने अलीकडेच दिली. दरम्यान एका प्रसिद्ध वृत्तपत्रासोबत संवाद साधताना त्याने कार व्यतिरिक्त स्वतःचं नवं घर देखील घेतल्याचा खुलासा केला आहे.

याबाबत बोलताना शशांक केतकर म्हणाला कि, ‘मी गाडी डिसेंबरमध्येच घेतली. आणखी एक खूप छान गोष्ट म्हणजे मी नवं घरही घेतलं आहे. मी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत. कारण मला सोशल मीडियावर सतत फोटो टाकायला आवडत नाही. काही घेतलं की टाका फोटो, हे आवडत नाही. आपल्या कुटुंबातच या गोष्टी साजऱ्या कराव्यात असं मला वाटतं’. शशांक केतकरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली अक्षय हि मध्यवर्ती भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.