Shashank Ketkar | ‘मोडलेल्या कचऱ्याच्या दोन पेट्या ठेवल्या…’ मुंबईमधील कचरापेटीची दुर्दशा पाहून संतापला शशांक केतकर


Shashank Ketkar | ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर हा घराघरात पोहोचला. त्याला आजही श्री या नावाने ओळखले जाते. शशांक हा एक उत्तम अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आणि समाजातील अनेक समस्या तो सोशल मीडियावर मांडत असतो. सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव न दाखवता तो सामान्य माणसांचे प्रश्न मांडत असतो. अशातच शशांक यांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

शशांक केतकर यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर मुंबईतील रस्त्यातील काही ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याने कॅप्शनमध्ये तसे मत मांडले आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेला हा व्हिडिओ टॅग देखील केलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “रस्ते शहर परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली आणि महानगरपालिकेचे जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिले आहे तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या दोन पेट्या ठेवल्या आहेत. होय आपण हे एकत्र करू शकतो पण हा प्रश्न आहे की खरंच आपली इच्छा आहे.”

त्याच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केला आहे. एकाने लिहिले आहे की, “मला वाटतं की आपला कचरा आपण कचराकुंडीत टाकावा ही सर्वस्वी आपली जबाबदारी नाही का? आणि फक्त सरकारच्या चुका दाखवून काय होणारे प्रत्येक व्यक्ती बदलेल तेव्हा देश बदलेल. असेही रामराज्य आले आहे. येथे बुद्धीही मिळेल आपल्याला प्रार्थना करून रामाकडे.” तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “लोकांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव असावी मुंबईत प्रत्येक ठिकाणी अशी अवस्था आहे.”

हेही वाचा – नेत्रदीपक!! ‘कसदार अभिनय, अचुक ताल आणि त्यावरील शास्त्रशुध्द नृत्य..’; ‘अरेंगेत्रम्’ने केलं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

शशांक यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे. शशांकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या मुरंबा मालिकेत काम करत आहे.