Shashank Ketkar | होणार सुन मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने या मालिकेतून खूप नाव कमावले. त्याला आजही सगळे श्री नावाने ओळखतात. शशांक सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक तसेच व्यवसायिक आयुष्यातील अनेक घटना तो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या पत्नी प्रियांकासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त शासनाच्या बायकोसाठी एक खास व्हिडिओ शेअर केलेला आहे.
हा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, “बायको हॅपी ऍनिव्हर्सरी.. तुला खरंच सांगतो तू आहेस म्हणून आज मी जो काही आहे तो आहे. तू माझ्यातल्या चिडक्या, भावूक, भांडणाऱ्या, प्रॅक्टिकल, व्यवहारी, अत्यंत तत्वनिष्ठ, कधीकधी खूप विचित्र वागणाऱ्या, अचानक मस्ती करणाऱ्या, शांत राहणाऱ्या शशांकला समजून घेतेस म्हणूनच म्हणतो तू आहेस म्हणून मी आहे आय लव यू.”
शशांकित करणे शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याची बायको प्रियांकाने कमेंट केली आहे आणि लिहिले आहे की, “शशा रडवलस यार’ अशा प्रकारे अनेक कलाकार देखील या पोस्टवर कमेंट करत आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते देखील या पोस्टवर कमेंट करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
हेही वाचा – सुखी वैवाहिक आयुष्याचे ’10 हजार 227 दिवस…’; नारकर जोडप्याच्या संसाराला 28 वर्ष पूर्ण
शशांक आणि प्रियंका यांनी 4 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले आहे. शशांकने तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रियांकाशी लग्न केले. प्रियंका ही त्याची लहानपणाची मैत्रीण आहे. त्या दोघांना ऋग्वेद नावाचा एक मुलगा आहे. शशांक हा सध्या मुरांबा या मालिकेमध्ये काम करत आहे.