‘प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण..’; शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांच्या दररोजच्या नित्य नियमावलीत या कार्यक्रमांचा समावेश आहे. यांपैकी एक मालिका म्हणजे ‘मुरांबा’. हि मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय यावर भरभरून प्रेम केले आहे. सध्या हि मालिका टीआरपी रेसमध्ये सर्वात पुढे आहे. याविषयी माहिती देणारी एक पोस्ट अभिनेता शशांक केतकरने शेअर केली आहे.

अभिनेता शशांक केतकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘Highest Gross Rating Point (GRP) स्टार प्रवाह या वाहिनी साठी on camera आणि off camera काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण 💙 या @star_pravah च्या विशाल सागरात मलाही काम करायची, हात पाय मारायची संधी मिळाली या बद्दल मी खरच ऋणी आहे’.

अभिनेता शशांक केतकरची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय मालिकेचे प्रेक्षक या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, शशांक केतकरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्याने ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या शिवाय शशांक केतकर ‘मुरांबा’ या मालिकेत साकारत असलेल्या अक्षय या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.