‘बाईपण’च्या यशानंतर लेकीच्या यशाने सुखावल्या शिल्पा नवलकर; म्हणाल्या, ‘मुलगी ग्रॅज्युएट होते तेव्हा…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने सर्व स्तरांवर कौतुकाची थाप मिळवली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गाजतोय. आतापर्यंत या चित्रपटाने सर्वधिक कमाई करून स्वतःचा असा वेगळा रेकॉर्ड तयार केला आहे. या चित्रपटाला महिलांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांनी पसंती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’तील ६ बहिणींची गोष्ट सगळ्यांना भावतेय. या ६ बहिणींच्या भूमिकेत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब दिसल्या आहेत.

या चित्रपटात केतकी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. एकीकडे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे यश आणि दुसरीकडे शिल्पा नवलकर यांची मुलीचे यश त्यांना सुखावून गेले आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर यांची लेक नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. यानिमित्त शिल्पा नवलकर यांनी सोशल मिडीयावर आपली लेक ग्रॅज्युएट झाल्याचे फोटो पोस्ट केलेत. सोबतच आपल्या लेकीच्या यशाचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या मुलीचे नाव कुहू असे आहे. कुहूच्या पदवीदान समारंभात शिल्पा नवलकर या त्यांच्या नवऱ्यासोबत सहभागी झाल्या होत्या. लेकीचे यश पाहून त्या प्रचंड आनंदी झाल्या. या समारंभातील विशेष फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘जेव्हा तुमची मुलगी ग्रॅज्युएट होते तेव्हा..’. आई आणि मुलीच्या यशाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे. या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट करत कुहूला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.