हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुसतं शिंदेशाही म्हटलं तरी लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्यातील गायकांचे चेहरे समोर दिसतात. जगभरात शिंदेशाहीचे चाहते आहेत. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा सुरेल वारसा आजही शिंदे घराण्यात कायम राखला जात आहे. आता शिंदे घराणं केवळ कलाविश्वापुरता मर्यादित राहिलेलं नाही. तर दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे घराण्याने आता उद्योग जगतात पदार्पण केलं आहे. यासंदर्भात गायक, अभिनेता आणि संगीतकार उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे तो कायम वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट शेअर करतो. स्वतःचे लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देखील देत असतो. आता उत्कर्षने एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. शिंदे कुटुंबीयांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं असून त्यांनी पंढरपूर येथे स्वतःचा पहिला पेट्रोल पंप सुरू केला आहे. या खास प्रसंगाचे काही फोटो उत्कर्षने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘छत्रपती शिवबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा, अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले, म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. बाबासाहेब तुम्ही म्हणालात – शिका! आम्ही गायक, डॉक्टर इंजिनिअर झालो. तुम्ही म्हणालात संघटित व्हा!! संघर्ष करा.. तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो. रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी, लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी’.
‘न थकता न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या ब्रीदवाक्याला सैदव मनात कोरून, काम करणारे आमचे शिंदे कुटुंब. भजन, कवाली, गायन, चित्रपट गीते आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत शिंदे परिवाराच पाहिलं पेट्रोल पंप.वेळापूर (पंढरपुर)येथे सुरू झालं. आता विषय पंपावर.. छत्रपती शिवबा, महात्मा जोतीबा, अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. रसिक माय बापाने भर भरून प्रेम दिले त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही.आम्ही हर्षद आदर्श उत्कर्ष असेच मेहनत करत राहू पण त्याल साथ हवी तुमच्या आशिर्वादाची. क्यूकी ज़िंदगी कि असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है!!’