दमदार शुक्रवार!! ‘बाईपण भारी देवा’ थिएटरमध्ये मोफत पाहता येणार; कधी आणि कुठे..? लगेच जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजतो आहे. दिनांक ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार आठवडे होऊनही थिएटरमध्ये कल्ला करतोय. या चित्रपटाचं सर्वाधिक क्रेझ महिला वर्गात पहायला मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ पहायला आजही प्रत्येक शोला थिएटरमध्ये गर्दी होतेय.अनेकदा चित्रपटाची तिकीटंदेखील मिळत नसल्याचे अनेक प्रेक्षकांनी सांगितले आहे. पण आज असे होणार नाही. कारण आजचा शुक्रवार घेऊन आला आहे ‘बाईपण भारी देवा’ मोफत पाहण्याची संधी. जाणून घेऊया कधी आणि कुठे..?

‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा आज मुंबईतील सिटीलाईट थिएटरमध्ये मोफत बघायला मिळणार आहे. शिवसेना प्रणित आणि शिव चित्रपट सेना यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा हा खास मोफत शो आयोजित केला आहे. या शोसाठी ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, सह कलाकार, तंत्रज्ञ आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेता आणि शिवसेना सचिव शिवचित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार या शोचा निमंत्रक आहे. यावेळी चित्रपटाच्या तंत्रज्ञांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. तर आजदिनांक २८ जुलै २०२३ रोजी, शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता सिटी लाईट सिनेमा- माहिम येथे ‘बाईपण भारी देवा’ या उदंड प्रतिसाद लाभलेल्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितूनुसार, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या आजच्या विशेष शोला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ निलम ताई गो-हे, खासदार राहुल शेवाळे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के, आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनी ताई जाधव, आमदार डॉ. मनीषा ताई कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल ताई म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख सौ कामिनी ताई शेवाळे, शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे, शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव, विभाग प्रमुख गिरीश धानुरकर, महिला विभाग प्रमुख सौ प्रिया ताई सरवणकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.