अखेर बंधनात!! शिवानी- अजिंक्यने उरकला गुपचूप साखरपुडा; फोटो शेअर करत दिला आनंदाचा धक्का


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि तिचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अजिंक्य ननावरे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांनी कुणालाही कानोकान खबर न लागत गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपला साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. हे फोटो व्हायरल होताच दोघांच्या चाहत्यांना सुखद धक्का लागला आहे.

सोशल मीडियावर हे कपल प्रचंड चर्चेत होते. याच वर्षात ते लग्न करणार अशी चर्चा रंगली होती. यावर त्यांनी कधीच स्पष्टीकरण दिले नाही. अशातच आता थेट साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर हि चर्चा खरी असल्याचे सिद्ध झाले आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ‘अखेर बंधनात’ असे कॅप्शन लिहित शिवानी सुर्वेने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने साखरपुड्यातील खास क्षण शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंमध्ये शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेचा लूक फारच लक्षवेधी आहे. साखरपुड्यासाठी शिवानीने फिकट जांभळ्या रंगाची हॅन्डवर्क असलेली डिझायनर साडी परिधान केली होती. त्यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि त्यावर टोपी घातली होती. दोघांची जोडी अगदी दृष्ट लागण्याजोगी दिसत होती. शिवानीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि अनेक कलाकार मंडळीं दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या कमेंट्स करताना दिसत आहेत.