विसर्जन फक्त म्हणायला रे..!! बाप्पाला निरोप देताना श्रेया झाली भावुक; म्हणाली, ‘ये लवकर पुढच्या वर्षी..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद, पावित्र्य आणि चैतन्यमय वातावरण निर्माण आले आहे. शनिवारी पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. यावेळी बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण भावुक होताना दिसला. अशीच अभिनेत्री श्रेया बुगडेसुद्धा भावुक झाली. तिने अधिकृत सोशल मिडीया हॅण्डल इंस्टाग्रामवर बाप्पाला निरोप देतानाची एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर ये असेही म्हटले आहे.

श्रेयाने बाप्पासोबतचा एक गोड फोटो शेअर करत लिहिलंय कि, ‘काल ”निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी” असे म्हणत तुझा निरोप घेतला .. आणि नेहेमी सारखे अश्रू अनावर झाले …. गेल्या इतक्या वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही … पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्या येण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही .. तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात .. तुझं कौतुक करतात .. तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो ..’.

‘हि प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव .. तुझी सेवा करायची संधी आम्हाला देत राहा!!! विसर्जन फक्त म्हणायला रे, बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि… कायम दिसत राहतोस .. कधी कामात, कधी माणसांमध्ये… माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत.. आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे… Mumma म्हणते तसं ”जाते नाही येते म्हणावं गं” मग आता .. ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने … तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं) सुखी राहा ! आनंदात राहा .. तुला खूप prem.. भेटूच’