हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगच्या जोरावर जिने कॉमेडी क्वीन अशी ओळख निर्माण केली ती म्हणजे श्रेया बुगडे. आजवर तिने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे श्रेयाला तिची खरी ओळख मिळाली. सोशल मीडियावर श्रेया बुगडे कायम सक्रिय असते आणि त्यामुळे तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, नुकतीच एका नामवंत वाहिनीला तिने एक मुलाखत दिली. यात तिने आपल्या वाईट सवयींबाबत खुलासा केला आहे.
या मुलाखतीत आपल्या वाईट सवयींविषयी बोलताना श्रेया बुगडे म्हणाली कि, ‘माणूस म्हणून आपण सगळेच जण खूप वेगळ्या पद्धतीचे झालो आहोत. रोज आपण छोट्या छोट्या तणावांतून जात असतो. मी खूप भावनिक आहे. मी प्रेमही जास्त करते आणि जेव्हा मला वाईट वाटतं तेव्हा मला त्रासही खूप होतो. नातं, नातेवाईक, मित्र- मैत्रिणींमध्ये माझी खूप गुंतागुंत होते. मी अतिविचार करते. एखादी गोष्ट घडलेली नसते; पण मी त्याचा जास्त विचार करते. त्यामुळे मला अतिविचार करणं कमी करायचं आहे. रावणाच्या रूपात मला माझ्यातली ही वाईट गोष्ट दहन करायची आहे’.
अभिनेत्री श्रेया बुगडे ही सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या अत्यंत लोकप्रिय कॉमिक कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या कार्यक्रमातून ती साकारत असलेली वेगवेगळी पात्रे कायम भाव खाऊन जातात. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातील श्रेयाने टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ‘तू तिथे मी’ या कार्यक्रमातील तिची भूमिका सर्वाधिक लक्षवेधी ठरली. यानंतर तिने छोट्या पडद्यावर ‘फू बाई फू’ या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि तिला यशाची गुरुकिल्ली सापडली. आज कॉमेडी विश्वात श्रेया बुगडे हे नाणं खणखणीत वाजतंय