हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शूट संपवून घर आलेला श्रेयस अस्वस्थ होता. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दखल केले गेले. यावेळी त्याला हदयविकाचा झटका आला. ज्यामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या सगळ्यात आता अभिनेत्याची पत्नी दीप्ती तळपदेने एक पोस्ट शेयर करुन त्याच्या तब्यतेविषयी अपडेट दिली आहे.
Actor Shreyas Talpade suffered a heart attack and was admitted to a hospital in Mumbai where he underwent an angioplasty. His condition is stable now.
(File pic) pic.twitter.com/I8RRSFyZFD
— ANI (@ANI) December 14, 2023
अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दिप्तीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘तुम्हा सगळ्यांनी माझ्या पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेली काळजी यासाठी मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि आम्हाला येत्या काही दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळेल. या सगळ्या काळात आम्हाला तातडीनं मिळालेली वैद्यकीय सुविधा आणि एकुण त्यांनी दाखवलेली तत्परता हे खूपच महत्वाचे आहे. मी सर्वांना या पोस्टच्या माध्यमातून विनंती करते की, या क्षणी आमची प्रायव्हसी जपण्यात यावी. श्रेयस बरा होईपर्यत आपण सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या शुभेच्छा आणि आधार हा आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे’.
दिप्तीने ही पोस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अत्यंत प्रांजळपणे तिने श्रेयसच्या चाहत्यांना आणि माध्यमांना त्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेंच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं तर, तो सध्या फिरोज नाडियावाला यांच्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु असून यामध्ये श्रेयस सोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी, परेश रावल, तुषार कपूर, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिझ आणि लारा दत्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.