Shreyash Talpade | ‘त्याचं हृदय 10 मिनिटासाठी बंद पडलं होतं’, प्रसिद्ध अभिनेत्याने दिली श्रेयस तळपदेच्या प्रकृतीची अपडेट


Shreyash Talpade | मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सगळ्यांना चिंता वाटत होती. वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काही ॲक्शन सीन केल्यानंतर त्याला असेच वाटू लागले. आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अशी माहिती दिली. आताच बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने प्रकृतीबाबत मोठे अपडेट दिलेली आहे.

बॉबी देवलने श्रेयशच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले की, “मी श्रेयसच्या पत्नीशी बोललो ती खूप अस्वस्थ वाटत होती. त्याचे हृदय दहा मिनिटांसाठी बंद पडलं होतं. पण आता त्याच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा”असं बॉबीने सांगितले.

हेही वाचा – ‘बाजार उठवीन तुमचा..’; ‘शुभविवाह’ मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची दमदार एंट्री

तसेच श्रेयसची पत्नी दीप्ती हिनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले. तिने सांगितले की, “श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे काही दिवसांमध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मी तुम्हाला विनंती करते की आमच्या गोष्टी खाजगी ठेवण्यास सहकार्य करा तुमचं प्रेम आणि पाठिंबा हीच आमच्या दोघांची ताकद आहे.”