नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे डिसेंबर २०२३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर एन्जोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग वरून परतताना, त्याला अस्वस्थ वाटू लागले. आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु आता तो एकदम ठीक झाला आहे आणि त्यांनी सोबत वाढदिवस देखील साजरा केला.
वाढदिवसाच्या एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने पिवळ्या शर्ट घातला आहे. आणि डेनिम घेतलेली दिसत आहे. यावर पापराजींनी सर तुम्ही कसे आहात हा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला की, “मी ठीक आहे.” यानंतर त्याने विचारले की, “मी कसा वाटतोय” यावर सगळे म्हणाले की, “सर तुम्ही चांगले दिसतात.” मग अभिनेता म्हणाला मला हेच ऐकायचं होत. त्यानंतर सिग्नेचर पोस्ट करून त्यांनी केक कापला.
हेही वाचा – ‘या माणसाला भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं…’ मराठा आरक्षणाबाबत अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत
या केकवरील मेणबत्ती वीझवण्यापूर्वी श्रेयसने प्रार्थना केली. तो म्हणाला की, “देव सर्वांना उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना. कारण एखाद्याची चांगले आरोग्य नसेल तर काय होऊ शकते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे असे कोणाचेही बाबतीत होऊ नये. अशी माझी इच्छा आहे हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य देवो.” असं म्हणून त्यांनी केस कापला.
त्याच्याच चाहतांना खूप आनंद झाला आहे. त्याला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ह्यावर एका युजर प्रत्येकाला हसवत असताना त्यामुळे त्याला सर्वांचे आशीर्वाद मिळतात तर आणखी एक जण म्हणाला की तू खरा माणूस आहे अशा प्रकारे सगळेजण त्याला शुभेच्छा देत आहेत.