श्री देवी प्रसन्न!! सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या २०२३ वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ज्यामध्ये काही कौटुंबिक, रोमँटिक तर काही ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘बॉइज ४’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी २०२३ या वर्षात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता नव्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये येणाऱ्या एका नवीन मराठी सिनेमाची करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘श्रीदेवी प्रसन्न’

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या टायटलमध्येच इतकं वेगळेपण आहे तर चित्रपटाच्या कथानकात किती वेगळेपण असेल…? याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून ‘झिम्मा २’मधील कबीर म्हणजेच स्मार्ट, डॅशिंग आणि चार्मिंग अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूड सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड, ब्युटीफुल आणि मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

या आगामी सिनेमातून पहिल्यांदाच बोल्ड ब्युटीफुल आणि चार्मिंग डॅशिंग अशी ही सई- सिद्धार्थची बेमिसाल जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एक वेगळीच प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. माहितीनुसार, श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरीसोबत हा सिनेमा म्हणजे एक एक कंप्लीट फॅमिली ड्रामा असणार आहे. या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.