तब्बल 16 वर्षांनी सई आणि श्रेयश एकत्र, ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज


अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि प्रेक्षकांना हाच चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे . तसेच केमिस्ट्री देखील सगळ्यांना आवडली आहे. या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. आणि या गाण्यात चक्क प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे ते म्हणजे या गाण्यात श्रेयस तळपदे देखील दिसत आहे.

यादी श्रेयस आणि सई ताम्हणकर यांना कांदेपोहे या गाण्यात एकत्र पाहिले होते. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडली होती. त्यांचा हा सनई चौघडे चित्रपट 2008 साली रिलीज झाला होता. यामध्ये सुबोध भावे, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, सई ताम्हणकर असा मल्टीस्टार हा चित्रपट होता.

हेही वाचा – ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’च्या शिरपेचात मानाचा तुरा; जगविख्यात ‘काला घोडा फेस्टिवल’च्या शुभारंभी होणार खास प्रयोग

या चित्रपटात एक रोमँटिक गाणे देखील सई आणि श्रेयस तळपदे यांच्यावर चित्रित झाले होते. परंतु आता तब्बल सोळा वर्षांनी सई आणि श्रेयश सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र गाण्यात दिसत आहे. श्रीदेवी प्रसन्नमधील दिल मे बजी गिटार हे गाणं रिलीज झाले आहे. यामध्ये सिद्धार्थ आणि सईची जोडी तर सगळ्यांना आवडली आहे परंतु शेवटी श्रेयस तळपदेची एन्ट्री ही चाहत्यांसाठी एक मेजवानीच आहे.

श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट 2 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाच्या गाण्यांची आणि ट्रेलरची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे.