Shyamchi Aai – मुहूर्त ठरला!! आई आणि मुलाच्या दृढ नात्याची गोष्ट ‘श्यामची आई’चा ब्लॅक अँड व्हाईट टीझर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Shyamchi Aai) आजवर मराठी सिनेविश्वात अनेक चित्रपट आणि अनेक कलाकृती आल्या. प्रेक्षकांनी काही कलाकृतींना प्रेम दिले तर काही कलाकृती नाकारल्या. मात्र काही कलाकृती कायम स्मरणात राहिल्या. त्यांपैकी एक म्हणजे ‘श्यामची आई’. आजवर अनेक थोर व्यक्तींचे आयुष्य मोठ्या पडद्यावर बायोपिकच्या माध्यमातून उलगडले. मात्र ‘श्यामची आई’ हि केवळ गोष्ट नाही तर हा एक जीवन अध्याय आहे. लवकरच आता ‘श्यामची आई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ज्याचा ब्लॅक अँड व्हाईट टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे हा टिझर ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यामुळे लक्षवेधी ठरतोय. या टिझर सोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली. (Shyamchi Aai) या टीझरमध्ये संपूर्ण साने कुटुंब एकत्र दिसत आहे. यामध्ये साने कुटुंब घराबाहेर उभे राहून फॅमिली फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सुरू असताना ‘भरजरी गं पितांबर’ हे गाणं ऐकू येत आहे. एकंदरच टीझरमध्ये कलाकारांचे लूक आणि सेटवरील मांडणी पाहून हा चित्रपट गोल्डन एरामध्ये घेऊन जाणार असे दिसत आहे.

या टीझरसोबत ‘श्यामची आई’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतही माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर, २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साने गुरुजी लिखित कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. तर दिग्दर्शनाची सूत्र राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय सुनील डहाके यांनी सांभाळली आहेत.

(Shyamchi Aai) या चित्रपटात ओम भूतकरने साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. तर श्यामची आई यशोदा हे पात्र गौरी देशपांडेने साकारले आहे. बाल कलाकार शर्व गाडगीळसह संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.