सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, पोस्ट करून अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या शुभेच्छा


अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक पॉवर कपल आहे. त्या दोघांचे जबरदस्त आहे ते दोघे देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि मिताली आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे l. यानिमित्त सिद्धार्थने मितलीला खास अंदाज शुभेच्छा दिलेल्याआहेत.

सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्राम अकाउंटवर मितालीसोबतचा लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. आणि लिहिले आहे की, “थ्री इयर्स हॅपी ऍनिव्हर्सरी बायको मी जे आहे तेच आहे कारण माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी आहेस कृतज्ञ.” सिद्धार्थने केलेल्या या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

अनेक कलाकार तसेच चाहते या पोस्टवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. मिताली आणि सिद्धार्थ यांनी पुण्यातील ढेपेवाड्यात 24 जानेवारी 2021 मध्ये लग्न केले लग्नाच्या आधीच्या एकमेकांना भेट केली. त्याचप्रमाणे ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये देखील जात होते.

सिद्धार्थ चांदेकरचा लवकरच श्री देवी प्रसन्न हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर देखील आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे आता सगळेजण या चित्रपटाची वाट पाहत आहे.