सिद्धार्थ जाधवने केली नव्या चित्रपटाची घोषणा; वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनी मन जिंकून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ जाधव आपला सिद्धू कधी झाला काही कळलंच नाही. आज याच आपल्या सिद्धूचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच सिद्धार्थने त्याच्या आगामी चित्रपटाची अर्थात नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘उलगुलान’.

‘उलगुलान’ या अनोख्या शीर्षकाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन तृषांत इंगळे करणार आहेत. गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या तृशांत इंगळे दिग्दर्शित ‘झॉलीवूड’ या चित्रपटातून झाडीपट्टी रंगभूमीची तुफान चर्चा रंगली. या चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा विविध गोष्टींमुळे या चित्रपटाला दिग्गजांकडून आणि समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. यानंतर आता तृशांत इंगळे ‘उलगुलान’ हा वेगळ्या पट्टीचा चित्रपट घेऊन येत आहे. तृषांतने सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत या सिनेमाची घोषणा केली आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने या चित्रपटाची घोषणा करताना पोस्टर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘उलगुलान’ #आपलासिध्दू
दिवस ऑक्टोबर “२३”
साल दोन हजार “२३”
कारकीर्दीचं वर्ष “२३”
आयुष्यातला एक महत्त्वाकांक्षी चित्रपट घेऊन येतोय….
असच प्रेम असुद्या…
“उलगुलान” च्या नावानं चांगभलं. २०२४ मध्ये चित्रपटगृहात….’.
सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहते, नेटकरी कमेंट करत त्याच्या नव्या चित्रपटाबाबत उत्सुकता व्यक्त करत आहेत.