Siddharth Jadhav | सिद्धूची स्टाईलचं न्यारी ! सोशल मीडियावर व्हायरल झाला नवा लूक


Siddharth Jadhav | अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनयाने आणि विनोद आणि सगळ्यांनाच आजपर्यंत खळखळून हसवले आहे. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याच एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात झळकला आहे. सिद्धू हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.

हेही वाचा – Bhagya Dile Tu Mala | ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत विदिशा म्हसकरची एंट्री, मालिकेला येणार नवे वळण

सिद्धार्थ पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला हजेरी लावली होती. आणि या प्रसंगी त्याने एक खास असा पेहराव केला होता. त्याने कुर्ता पायजमा घातला होता. त्याचप्रमाणे त्याच्या कुर्तीवर चित्रपट नाटकांची नावे लिहिली होती. हे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून त्यांनी कॅप्शन लिहीले आहे की, “अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा पेहराव जो माझ्यासाठी तयार केलाय सायलीने.”

सिद्धार्थने पुढे लिहिले की, “ज्या रंगभूमीने मला घडवलं त्या रंगभूमीचा एक रंगकर्मी. त्या रंगभूमीचा मी सेवक म्हणून या नाट्य संमेलनात सन्मान आणि सहभागी होताना खूप साऱ्या अनुभवाच्या शिकवणीतून मला आज काहीतरी सापडले. हाच आनंद मोठा आहे. माझ्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांचे प्रेम माझ्या पदरात टाकणाऱ्या या रंगभूमीचा रंगकर्मीचा हा सोहळा मी मोठ्या सन्मानाने अनुभव अभिमानाने अनुभवला हेच सांगायचे तुम्हाला.”

सिद्धार्थने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सिद्धार्थ सध्या होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.