एक अल्बम, चार गाणी!! प्रत्येक गाणं, ‘एका तुटलेल्या हार्टची कहाणी’; अवधूत गुप्तेंची नवी निर्मिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कला विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे कायम त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी काही ना काही नवनवीन उडत्या चालीची गाणी घेऊन येत असतात. अलीकडेच त्यांचा ‘लावण्यवती’ हा अल्बम रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी त्यांचा नवा संगीत अल्बम ‘विश्वमित्र’ची घोषणा केली आहे.

माहितीनुसार, अवधूत गुप्तेंचा हा नवा अल्बम १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या नव्या संगीत अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या अल्बममध्ये एकूण ४ गाणी असणार आहेत. यातील प्रत्येक गाणं हे एका तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणारं आहे. ‘लवचा खंजीर जर एकदा छातीत घुसला तर कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी..’ असं म्हणत लवकरच यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आपल्या ‘विश्वमित्र’ या नव्या संगीत अल्बमबद्दल गायक अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि संगीत प्रेमींसाठी आम्ही एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ अल्बम घेऊन आलो आहे. या अल्बममध्ये चार गाणी आहेत. ही चारही गाणी अधुऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. जसं प्रेम ‘लावण्यवती’ ला मिळालं तसंच ‘विश्वामित्र’ ला ही मिळेल याची मला खात्री आहे’.


News Hub