‘.. मी या पुढे सीरियलमधे नसेन’; ‘तू चाल पुढं’ मालिकेला प्रसिद्ध अभिनेत्रीचा रामराम


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ टीआरपीच्या बाबतीत रोज एक पायरी वर चढते आहे. गेल्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचा सर्वाधिक लक्ष वेधून घेतला आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसते आहे. ती साकारत असलेली अश्विनी हि एक सर्वसामान्य गृहिणी आहे. जिच्या असामान्य स्वप्नांचा प्रवास या मालिकेत दाखवला आहे. मालिकेत काही तिचे सोबती आहेत तर काही तिचे पाय ओढण्याच्या प्रयत्नात असल्याचे कायम दाखवले जाते. या सर्व कलाकारांच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे आणि अशातच आता एका अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे.

‘तू चाल पुढं’ या मालिकेत अश्विनीला कायम सपोर्ट करणारी, तिच्या सोबत भक्कमपणे उभी राहणारी तिची खास मैत्रीण प्राजु आता या मालिकेचा भाग नसणार आहे. म्हणजेच प्राजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा माजगावकर या मालिकेतून बाहेर झाली आहे. याबाबत तिने स्वतःच काही दिवसांपूर्वी स्लोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचे काही फोटो, सहकालाकरांसोबतची मजा, मस्ती करतानाचे फोटो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘तू चाल पुढं’ या मालिकेत प्राजक्ता पांडे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा माजगावकर आता या मालिकेचा भाग नसणार आहे. मात्र तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिचे प्रचंड कौतुक केले जात आहे. ‘यादों की अलमारी, Being Praju’ असं कॅप्शन देत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचे सहकलाकार आणि मालिकेच्या क्रू मेंबरसोबतचे तिचे फोटो दिसत आहेत. याशिवाय तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे कि, ‘सीरिअल संपत नाहीये… मी या पुढे सीरियल मधे नसेन’. स्नेहाने मालिका सोडल्याचे समजल्यानंतर प्रेक्षकांनी थोडी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय अनेकांनी ‘प्राजु आम्ही तुला मिस करू’ असे म्हटले आहे.