‘फ्रेंडशिप डे’निमित्त सोनालीने शेअर केला BFF सोबतचा BTS व्हिडीओ; म्हणाली, ‘.. फ्रेंड जरुरी होता है’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार असून जगभरात आजचा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आज सोशल मीडियावर जो आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि आठवणी शेअर करताना दिसतोय. मग या सगळ्यात सेलीब्रिटी मंडळी कशी काय मागे राहतील.. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलच्या माध्यमातून एक BTS डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत म्हणजेच प्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकरसोबत दिसते आहे.

आजच्या फ्रेंडशिप डे’चं खास निमित्त साधून सोनाली कुलकर्णीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाली आणि फुलवा एकत्र वाळूमध्ये नाचताना दिसत आहेत. हा बिहाइंड द सीन्स व्हिडीओ असून यात सोनाली आणि फुलवा खूप मस्ती करताना एकमेकींची कंपनी एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसोबत सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हर एक friend ज़रूरी होता है…. अशी मैत्रीण जिच्यासोबत मी माझ्या मनापासून नाचू शकते..’

या व्हिडिओसोबत सोनालीने ‘हॅपी फ्रेंडशिप डे’, ‘फ्रेंडशिप गोल’, ‘बीएफएफ’ असे हॅशटॅग दिले आहेत. दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओवर सोनालीची आणखी एक खास मैत्रीण अभिनेत्री सई ताम्हणकरने कमेंट केली आहे. ती म्हणाली आहे कि, ‘आज फ्रेंडशिप डे आहे…? हॅपी फ्रेंडशिप डे चिऊ. आय लव्ह यू’. सईच्या या कमेंटवर सोनालीने प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘हम्म. भारतात आहे. पण आपली मैत्री तर आंतरराष्ट्रीय आहे ना. आय लव्ह यू टू चिबू’.