जर तुम्ही पुणे- मुंबई प्रवास करण्याचा विचार करताय तर… थांबा!! सोनाली कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट वाचा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाळा म्हटलं कि खंडाळा- लोणावळ्याला फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दुप्पटीने वाढते. त्यामुळे मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर गाड्यांच्या रांगाचं रांगा लागतात. याशिवाय अनेक प्रवासी दररोज कामानिमित्त या मार्गावरून प्रवास करत असतात. मात्र पावसाळ्यात हा महामार्ग अनेकदा जाम झालेला पहायला मिळतो. अशातच दरड कोसळल्याने खंडाळा घाटात आणखीच कोंडी होते. दरम्यान पुणे- मुंबई प्रवासाचं प्लॅनिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महत्वपूर्ण माहिती देणारी एक पोस्ट सकाळी शेअर केली होती.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सोनाली कुलकर्णीने लिहिले आहे की, ‘जर तुम्ही पुणे ते मुंबई हा प्रवास करणार असाल तर कृपया करू नका! संपूर्ण घाट जाम आहे’. सोनालीने हि पोस्ट सोमवारी सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पुणे- मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा एक छोटा व्हिडीओदेखील जोडला आहे. ज्यावरून स्पष्ट होतंय कि सोनाली पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली असताना तिला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे इतर कोणी अडकू नये म्हणून तिने हि पोस्ट शेअर केली आहे.

त्याच झालं असं कि, गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे आणि या दरम्यान रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली. याशिवाय पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरसुद्धा अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती समोर आली आहे. साहजिकच दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. याच परिणाम वाहतुकीवर झाला असून रविवारी मध्यरात्रीपासून पुणे ते मुंबई वाहतूक अतिशय मंद गतीने सुरु आहे. ही धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर २ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या लोकांना साहजिकच या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.