हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अनेक मित्रांच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. मैत्रीचे उदाहरण देता येईल अशी यांची यारी चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचा भाग नसल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कोणताही द्वेष, राग किंवा वाईट भावना न ठेवता कलाकार मंडळी देखील एकमेकांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण नटे ठेऊ शकतात हे या मित्रांच्या जोड्या पाहिल्या कि आपसूकच स्पष्ट होत. सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकर यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये आहे. तर सोनाली, प्रार्थना बेहरे आणि सई ताम्हणकर हे त्रिकुटदेखील खास आहे.
या तिघीही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. चित्रपट सृष्टीत तिघीही आघाडीच्या नायिका आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात कोटीही स्पर्धा न ठेवता तिघी मस्त एन्जॉय करताना दिसतात. नुकताच सोनालीने तिघींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या मैत्रीची एक छोटीशी झलक आपण पाहू शकतो. सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर आणि प्रार्थना बेहरे या दोघीही ‘अजीब दास्तां है ये, कहा शुरु कहा खतम…’ हे अत्यंत लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहेत. दोघींचे हावभाव पाहून समजते कि हे गाणे त्या सोनालीसाठी गात आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने भन्नाट कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं आहे कि, ‘याला म्हणतात खूप जवळची मैत्री… या अशा वागणार आणि माझा अपमान करणार. देव करो अन् सर्वांना यांच्यासारखे मित्र मिळो!!!’ सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ‘जागतिक मैत्री दिना’निमित्त तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या मैत्रीला नजर लागू नये असे म्हटले आहे.