हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील हि सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस मराठी व्यक्तिरिक्त तिने ‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. नुकतीच सोनालीने एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री सोनाली पाटीलच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी तिने ही पोस्ट शेअर केली आहे. ही महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तिची आजी. आजीसोबतचा एक रील व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तर ही आहे माझी ”आजी” … आईची आई तिला सगळे प्रेमाने “आऊ” म्हणतो… तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचा आणि तिच्या अनुभवांचा माझ्यासाठी, माझं आयुष्य जगण्यासाठी आणि ते सोप करण्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे… कारण ती आजही प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक गोष्टीतून नवीन काहीतरी शिकवत असते आणि मला ते सगळं तिचं ऐकायचं असतं… आत्मसात करून माझ्या आयुष्यामध्ये उतरवायचा असतं… असं एका शब्दात नाही सांगता येणार पण तिची ”दुनियादारी” तिचा प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही औरच आहे… कदाचित जर मी तिला ऐकलं नसतं तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीतरी वेगळाच असता ….पण आता मी जशी काय आहे ते तिच्यामुळे…’
‘तिच्या संस्कारांमध्ये वाढले, आपण इतरांसाठी त्यांच्या सुखासाठी कसं जगलं पाहिजे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या हास्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं एक ना अनेक हे सगळं मी तिच्याकडून शिकले… ती सारखी म्हणते अगं लहान बाळ असलं तरी त्याच ऐकायचं कारण ते सुद्धा आपल्याला जे सांगत असतं त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं… म्हणून निदान त्याचं ऐकून तरी घ्यायचं आणि यातून नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतात… तिचे बरेच फंडे मी ऐकत असते आणि फॉलो पण करत असते बरं का… तर ही माझी आऊ … तिच्याबरोबर मी रील केला खरा पण तिला खोटं सांगून की हा व्हिडिओ फक्त आपल्या दोघींसाठी आहे… पण आता तुम्हा सगळ्यांना सांगते हे आपल्यातलं सिक्रेट आपल्यातच राहू दे बरं का…’. सोनालीची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.